प्रतिनिधी: जम्मू काश्मीरात विधानसभा निवडणुकीत होणार असताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जनसभेला संबोधित करताना ‘पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरते त्यांना माहीत आहे, गरज पडल्यास भारत गोळ्या झाडेल’ अशा शब्दांत अमित शहा यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये आता शांतता प्रस्थापित झाली असल्याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी यावेळी केला आहे.
याविषयी अधिक बोलताना अमित शहा म्हणाले,’पाकिस्तानच्या गोळ्यांना उत्तर गोळ्यांनी दिले जाईल गोळ्यांचा मुकाबला संवादाने होऊ शकत नाही ‘असा सज्जड दम शहा यांनी पाकिस्तानला दिला आहे. भाजपचा निवडणूक प्रचार करताना अमित शहा म्हणाले, ‘ एक वेळ अशी होती जम्मू आणि काश्मीरचे लोक पाकिस्तानला घाबरून होते आता पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरते. परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. भाजपचे उमेदवार मुर्तझा खान यांचा प्रचार करताना अमित शहा यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
‘मी गुजरातमध्ये राहतो. मला कधी कल्पना नव्हती की एलओसीपासून केवळ २ किलोमीटर असलेल्या मेंधार (Mendhar) मधील जनेतला संबोधित करेन.आपले गुज्जर, बकरवाल, पहारी बांधव आपल्या देशासाठी कायम सशशच सैनिक म्हणून खंबीरपणे उभे राहिले आहेत जेव्हा जेव्हा १९४७ नंतर पाकिस्तानविरोधात सैन्य उभे राहिले आहे ‘मंधार मधून मी आज सांगू इच्छितो की आज संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे.मी आपणास विनंती करतो की देशाच्या रक्षणासाठी नरेंद्र मोदी यांना आपण साथ द्या ‘असे उद्गार मंत्री अमित शहा यांनी यावेळी काढले आहेत.