५००० कोटींचा आयपीओ येणार
मुंबई: द लिला लक्झरी हाँटेलची मुख्यकंपनी Schloss Banglore कंपनीने सेबीकडे डीआरएचपी (Draft Red Herring Prospects) भरल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ ५००० कोटींच्या घरात असण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. ज्यामध्ये ३००० कोटी समभागांचा (Shares) समावेश होणार आहे.तर प्रोजेक्ट बँलेट बंगलोर होल्डिंग्स (DIFC) आपले २००० कोटींचे समभाग विकणार आहेत. डीआयएफसी Brookfield Asset Management Company शी संबंधित संस्था आहे.
या आयपीओतून मिळवलेल्या २७०० कोटी निधीचा वापर कंपनी आपल्या थकबाकी चुकवण्यासाठी करणार आहे. तसेच कंपनी आयपीओपूर्वी ६००० कोटींचे प्रेफरन्सशियल इश्यू ऑफर देखील देण्यात येऊ शकते.या आयपीओसाठी जे एम फायनाशिंयल, बोफ सिक्युरिटीज,मॉर्गन स्टेनली, जे पी मॉर्गन, कोटक महिंद्रा कॅपिटल,एक्सिस कॅपिटल, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट,आयआयएफएल सिक्युरिटीज, आयसीआयसीआय बँक सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल इन्व्हेसमेंट अँडव्हायजर, एसबीआय कॅपिटल मार्केट या कंपन्या बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.
थकबाकी दिल्यानंतर राहिलेल्या रकमेचा वापर कंपनी दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे. २००० कोटींच्या ऑफर फॉर सेल (OFS) रकमेचा निधी कंपनीचे प्रवर्तक (Promoter) यांना मिळू शकतो. लिला ब्रँड हा कॅप्टन सी पी कृष्णन यांनी १९८६ साली सुरू केला होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला २.१ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता व त्यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीला ६१.७ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.
मार्च २०१९ मध्ये ब्रूकफिल्डने दिल्ली, बेंगळुरू, उदयपूर आणि चेन्नई येथील चार लीला पॅलेस मालमत्ता जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून ३९५०कोटी रुपयांना विकत घेतल्या. कंपनी सध्या भारतातील १० शहरांमध्ये १२ हॉटेल्स चालवते आणि २०२८ पर्यंत आठ नवीन हॉटेल्स सुरू करण्याची योजना कंपनी आखत आहे.
