प्रतिनिधी: मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला होता.त्यांना जामीन मिळूनही आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एलजी यांना भेटून देणार असल्याचे केजरीवाल म्हणाले होते.अखेर त्यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर आम आदमी पार्टी तर्फे विद्यमान दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी या घोषणा झाली. माध्यमांच्या माहितीनुसार अजून केजरीवालांचा राजीनामा अधिकृतपणे एलजी कार्यालयात पोहोचला नसला तरी आज संध्याकाळी ४.३० वाजता अतिशी यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.आम आदमी पक्षातर्फे नक्की वेळ घोषित करण्यात आली नसली तरी संध्याकाळी अतिशींचा शपथविधी सोहळा होणार आहे. अतिशी या आम आदमी पक्षाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.
अतिशी यांच्यासह कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ गोपाल राय,कैलाश गेहलोत,सौरभ भारद्वाज,मुकेश अहवालात,सुलतानपूर मजरा इत्यादी घेऊ शकतात. मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांचे नाव खुद्द अरविंद केजरीवाल यांनी सुचवले होते असे सुत्रांनी म्हटले होते. अतिशी कलकाजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.दिल्ली सरकारमधील अनेक मंत्रीपदाचा भार त्यांनी सशक्तपणे सांभाळला होता. अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू म्हणून अतिशी यांची ओळख आहे. एकाच वेळी त्यांनी १३ खात्यांचा पदभार स्वीकारला होता.आता अतिशी यांची वर्णी लागल्याने दिल्लीला पुन्हा एक नवा मुख्यमंत्री लाभला आहे.
