अभिनेते प्रवीण दाबस आयसीयुत

2 years ago 0 23

प्रतिनिधी: अभिनेते प्रवीण दाबस यांचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.सध्या प्रवीण दाबस आयसीयुत दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.त्यांचा अपघात झाल्याची माहिती माहिती प्रो पंजा लीगने प्रसारमाध्यमांवर दिली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी होली फँमिली रूग्णालयात दाखल करण्यात आले.याविषयीची अधिक माहिती उपलब्ध नसली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

प्रवीण दाबस यांनी आपल्या कारकीर्दीत काही गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.ज्यामध्ये माय नेम इज खान,खोसला का घोसला,रागीनी एमएमएस २ अशा चित्रपटात काम केले आहे. प्रो पंजा पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत, ‘आम्हाला हे कळवताना अत्यंत वाईट वाटत आहे की, प्रो पंजा लीगचे सह संस्थापक प्रवीण दाबस यांचा दुदैवी अपघात झाला.त्यांच्यावर होली फँमिली रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला होता.अजून अधिक माहिती मिळाली नसली तरी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आम्ही त्यांच्या प्रकृती सुधारणेकडे लक्ष बाळगून आहोत’असे म्हटले.  

फेब्रुवारी २०२० मध्ये दाबष यांनी किरेन रिजीजू व विजेंदर सिंह यांच्यासह प्रो पंजा लीगची स्थापना केली होती.त्यांनी १५ हून अधिक चित्रपटात काम केली आहेत.डाबस यांचा विवाह प्रिती जांगियानी यांच्याशी झाला आहे.प्रिती जांगियानीही अभिनेत्री आहेत.त्यांनी मोहब्बते चित्रपटात काम केले होते.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *