व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी स्वतः रेखाटलेले व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन शिवसैनिक अनंत रामचंद्र घरात यांनी केले आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्र प्रदर्शनामध्ये यावेळी सध्या सर्वत्र बहुचर्चित असलेला विषय तो म्हणजे संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण. तसेच बीडचे राजकारण अश्या संदर्भातले व्यंगचित्र या प्रदर्शनात प्रकर्षाने दिसले. यानंतर स्वतः व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी या चित्रा बाबतची अधिक माहिती दिली आहे..
On the occasion of the birth anniversary of Shiv Sena chief and cartoonist Balasaheb Thackeray, an exhibition of cartoons drawn by cartoonist Amit Papal himself has been organized at Balgandharva Rangmandir in Pune. This cartoon exhibition has been organized by Shiv Sainik Anant Ramchandra Gharat. This cartoon exhibition was inaugurated by Leader of the Opposition Ambadas Danve. The topic of the cartoon exhibition, which is currently being discussed everywhere, is the murder case of Santosh Deshmukh. Also, cartoons related to Beed politics were prominently seen in this exhibition. After this,we communicate with cartoonist Amit Papal himself, he has given more information about this picture.