वैजापूर तालुक्यातील शेतकरी गेल्या 10 दिवसापासून, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, आमरण उपोषण करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या विक्री नंतर अद्यापही विकलेल्या मालाचे पैसे मिळाले नसून वारंवार निवेदने करूनही कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तसेच आमरण उपोषण करूनही प्रशासन दाद देत नसल्याने, आज शेवटी शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. जो पर्यंत न्याय मिळणार नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही. अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे. शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे अजय पाटील साळुंके यांनी प्राईम टाईम महाराष्ट्रला महत्वाची माहिती दिली आहे पाहुया.
Farmers in Vaijapur taluka have been on a hunger strike for the last 10 days in front of the Agricultural Produce Market Committee. After the sale of onions in the Agricultural Produce Market Committee, no one is ready to pay attention despite repeated representations. Also, since the administration is not appreciating them despite the hunger strike, today the farmers are finally protesting by climbing on water tanks. Until justice is not done. They will not come down. This is the stance taken by the farmers. Let’s see what Ajay Patil Salunke, who is agitating on the farmers’ issue, has given important information to Prime Time Maharashtra.