अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील आगीने रौद्ररूप धारण केलंय. या आगीचा फटका हॉलिवूडसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना पण बसलाय. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलिसच्या आसपास लागलेल्या आगीमुळे सुमारे 10 हजार घरे जळून खाक झाली आहेत. 4 दिवसांपासून धुमसत असलेली ही आग सुमारे 40 हजार एकर परिसरात पसरली आहे. यामध्ये 29 हजार एकर जमीन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर या आगीमुळे 10 हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय सुमारे 30 हजार घरांचे नुकसान झाले आहे. लॉस एंजेलिस आणि आजूबाजूच्या परिसरात लागलेली ही सर्वात मोठी आग आहे. या आगीमागचं नेमकं कारण काय? लॉस एंजेलिसमधील जंगलं आगीने का धगधगत आहे? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
The fire in California, America has taken a violent turn. This fire has affected Hollywood and Bollywood celebrities as well. About 10,000 houses have been burnt down due to the fire that broke out around Los Angeles in the state of California, America. This fire, which has been burning for 4 days, has spread to an area of about 40,000 acres. Of this, 29,000 acres of land have been completely burnt down. While 10,000 buildings have been burnt down due to this fire. Apart from this, about 30,000 houses have been damaged. This is the biggest fire in Los Angeles and its surrounding areas. What is the real reason behind this fire? Why are the forests in Los Angeles burning? Let’s find out all these things through this video.