बई: महाराष्ट्रातही निवडणूकीचा डंका वाजत असताना बीएमसी प्रशासनाकडून आज शनिवारी धारावीत अनाधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात येणार होती.परंतु मशिदीवर कारवाई करणार असल्याचे समजताच काल रात्रीपासून मुस्लिम समाजाचा जथ्था रस्त्यावर आला होता. अखेर सकाळी बीएससीचे अतिक्रमण विभागाचे पथक धारावीत कारवाईसाठी गेले असता मोठा हंगामा झाला.
गेल्या महिन्यापासून अनाधिकृत बांधकामे पाडण्यासाठी बीएमसी व राज्य प्रशासनाने मोठ्या कारवाईत वाढ केली होती.त्याच धर्तीवर २५ वर्षांहून अधिक जुनी असलेल्या मेहबूब ए सुबानी नावाच्या अनाधिकृत मशिदीवर कारवाई करण्याचे आदेश मिळताच बीएमसी पथकाने धारावीत धडक कारवाई केली. घटनास्थळी मुस्लिम समाजाकडून मोठा विरोध बीएमसी पथकाला झेलावा लागला.काही तास तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या दोन वाहनांची तोडफोड देखील केली गेली आहे.तसेच घोषणाबाजीही करण्यात आली होती.जमलेल्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. मुस्लिम समाजाचे नेते तसेच राजकीय नेते नसीम खान,खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले. पोलिस, महापालिका प्रशासन, मशिदीचे ट्रस्ट सदस्य यांच्यात बैठक झाल्यानंतर यावर तोडगा निघाल्याचे समजत आहे. दरम्यान वर्षा गायकवाड व नसीम खान यांनी मशिदीवर कारवाई करण्यास विरोध दर्शविला.
अखेर तत्काळ तोडगा निघत तत्काळ कारवाईस स्थगिती मिळाली असून पालिकेने सहा दिवसांचा कालावधी दिला आहे.त्यामुळेच वर्षा गायकवाड यांनी उपस्थित जमलेल्या लोकांना ‘शांतता राखा आम्ही तुमच्या सोबत आहोत सहकार्य करा व आपल्या घरी परत जा ‘असे आव्हान वर्षा गायकवाड यांनी उपस्थितांना केली आहे. अशा प्रकारे कारवाई करण्यास आमचा विरोध असुन ही कारवाई अचानक का करण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थितांनी केला आहे.
दरम्यान ही कारवाई नियमानुसार करण्यात येत आहे असे प्रशासनाचे म्हणणे होते. दरम्यान भाजपचे किरीट सोमय्या यांनी कारवाईला पाठिंबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावर महाविकास आघाडी राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय राऊत यांनी हा प्रश्नात गृहमंत्र्यांनी लक्ष दिल्याचा सल्ला दिला होता.तर भाजप आमदार नितेश राणे यांनी जिहादयांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे का हा प्रश्न उपस्थित केला आहे.एकीकडे संविधानावर बोलायचे दुसरीकडे अनधिकृत कारवाई तोडण्याला विरोध करायचा ही दादागिरी महाराष्ट्रात चालू आहे असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.हे उद्योग पाकिस्तान बांगलादेशात करा असाही आरोप नितेश राणे यांनी केला.