बॉलीवूडच्या बेबोचा आज वाढदिवस!

2 years ago 0 20

मुंबई: बॉलीवूडची बेबो म्हणून प्रसिद्ध असलेली चतुरस्त्र अभिनेती करीना कपूर हिचा आज ४४ वा वाढदिवस आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटी व नेटिझन्सनी तिच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव केला.करीना कपूर खानला हिंदी चित्रपटसृष्टीतील मित्र, मैत्रिणी ज्यामध्ये कॅटरिना कैफ, अक्षय कुमार, अनन्या पांडे, अजय देवगण यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  

नुकताच करिना कपूरचा हंसल मेहता दिग्दर्शित ‘मर्डर्स अँट बर्मिंगहॅम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये करिना कपूरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका लीलया पार पाडली होती. करिना कपूर हिने आपल्या कारकीर्दीत अनेक गाजलेल्या भूमिका केल्या आहेत. तिने चमेली, जब वी मेट,हिरोईन ,सिंघम २, ३ इडिअट अशा एकापेक्षा एक चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *