प्रतिनिधी: भारतासारख्या मोठ्या देशातील ‘बड्या’ कंपनीचे टेलिग्रामवरील डेटा लिक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.प्रसिद्ध सोशल मिडिया अँप टेलिग्रामावर भारतातील मोठ्या विमा (Insurance) कंपन्या स्टार हेल्थ व अलाईड इन्शुरन्स या कंपनीच्या ग्राहकांची खाजगी माहिती टेलिग्रामवर लीक होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा डेटा लीकचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टेलिग्रामवरील चाटबोट (Chatbot) मार्फत हा डेटा चोरी होऊन सहज सार्वजनिक झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये लाखो लोकांची खाजगी माहिती उघडी झाल्याने राईट टू प्रायव्हसी या संविधानिक मुलभूत हक्काची पायमल्ली झाल्याचा गंभीर आरोप टेलिग्रामवर केला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या डेटा लीक द्वारे घराचा पत्ता,खाजगी माहिती,टेलिफोन क्रमांक,कार्यालयीन माहिती, व इतर माहिती चाटबोटवर सहज उपलब्ध झाल्याने मोठा कल्लोळ झाला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबद्दलची माहिती शुक्रवारी दिली होती.
स्टार हेल्थ व अलाईड इन्शुरन्स या भारतातील मोठ्या कंपन्या असून दोन्ही कंपन्यांचे बाजार भांडवल ४ अब्ज डॉलर्सहून अधिक आहे.रॉयटर्सला दिलेल्या अहवालात दोन्ही कंपन्यांच्या स्पष्टीकरणात म्हटल्याप्रमाणे, याने स्थानिक प्राधिकरणांना कथित अनधिकृत डेटा प्रवेशाचा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की प्रारंभिक मूल्यांकनात ‘कोणतीही व्यापक तडजोड नाही’ आणि ‘संवेदनशील ग्राहक डेटा सुरक्षित राहतो असे दिसून आले आहे.’ असे म्हटले.
