२५ सप्टेंबरला रेडमीचे ‘हे’ नवे स्मार्टवॉच बाजारात ‘ही’ विशेषफिचर्स 

2 years ago 0 60

प्रतिनिधी: किफायतशीर किंमतीत नवे फिचर्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेडमी (Redmi) कंपनीचे नवे स्मार्टवॉच बाजारात लाँच होणार आहे.रेडमी वॉच ५ लाईट हे भारतात २५ सप्टेंबरला बाजारात येत आहे. यात विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच या स्मार्टफोनमध्ये १.९६ इंचाचा अमोलडेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 

या स्मार्टवॉचची प्रमुख वैशिष्ट्ये –  

१) १.९६ इंच डिस्प्ले  

२) अमेझॉन अलेक्सा सपोर्ट  

३) १८ दिवसांची बॅटरी  

४) हायपर ओएस स्क्रिन  

मुख्यतः कॉलिंगचे फिचर यात रेडमीने नेहमीप्रमाणे देत स्मार्ट फिचर कायम ठेवले आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये कंपनीने लिहिले होते की,’स्मार्टवॉच भारतात २५ सप्टेंबर दुपारी १२ वाजता लाँच होणार आहे.तसेच याच घड्याळाची संपूर्ण स्पेसिफिकेशन फिचर्सची माहितीही या पोस्टमध्ये कंपनीने अंतर्भूत केली आहे. या स्मार्टवॉचची किंमत २७९९ रुपये असणार असल्याची प्राथमिक माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.मेट सिल्वर, व मिड नाईट ब्लँक या दोन कलर वेरिंएटमध्ये हे घड्याळ असणार आहे. 

याशिवाय महत्वाचे म्हणजे हे घड्याळ आयपी ६८ रेटेड असल्याने पाण्यापासून सुरक्षित असू शकते.घड्याळाचा युजर इंटरफेस आकर्षक होण्यासाठी कंपनीने २०० हून इन बिल्ड २०० वॉच फेसेस दिले गेले आहेत. वॉच ५ ॲक्टिव्ह एका महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आला होता. ॲक्टिव्ह हे आकर्षक आणि कार्यक्षम डिझाइनसह येते.यात ३२० x ३८५ पिक्सेल रिझोल्यूशनसह मोठा २ -इंचाचा उच्च-रिझोल्यूशन एलसीडी डिस्प्ले आहे आणि ५०० nits पर्यंत समायोजित करण्यायोग्य ब्राइटनेस आहे. घड्याळ हलके आहे, वजन फक्त ४२.२ ग्रॅमआहे, आणि १३५ ते २०५ मिमी पर्यंतच्या समायोजित करण्यायोग्य टीपीयु (TPU) पट्ट्यासह आरामात बसते. 

कम्युनिकेशनसाठी ते ब्लूटूथ कॉलला समर्थन देते, स्पीकर आहे आणि स्पष्ट कॉल गुणवत्तेसाठी ३ माइक सिस्टम आहे.यात एसओएस कॉल सपोर्ट,कॉल इतिहास आणि आवडते संपर्क देखील आहेत. हे घड्याळ अँड्राईड आणि आयओएसशी सुसंगत असून स्ट्रावा आणि ॲपल हेल्थसारख्या ॲपला सपोर्ट करते. 

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *