छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय लोकशाही दिनात दाखल झालेल्या २५ प्रकरणांवर सुनावणी

2 years ago 0 7

“प्रलंबित प्रकरणांचा तत्परतेने निपटारा करा” – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांकडून प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रार अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यात यावी. प्रलंबित प्रकरणांचा तत्परतेने निपटारा करुन केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना पत्राद्वारे कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. यादरम्यान उपायुक्त जगदिश मिनीयार, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह महसूल, पोलीस, कृषी, महापालिका, सहकार, भूमी अभिलेख, समाजकल्याण व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकशाही दिनात नव्याने दाखल पाच प्रकरणे व यापूर्वीचे वीस प्रकरणे अशा २५ प्रकरणांवर सुनावणी झाली. यापुर्वीच्या २९ प्रलंबित प्रकरणापैकी ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आयुक्त श्री. गावडे यांनी तक्रारदारांचे म्हणने ऐकुण घेत प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या आहेत. प्रत्येक प्रकरणामध्ये नियमाप्रमाणे तत्परतेने कार्यवाही करावी. पुढच्या लोकशाही दिनापुर्वी सर्व प्रकरणांचा निपटारा करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. कोणत्याही परिस्थितीत याबाबत प्रलंबितता राहता कामा नये, असेही त्यांनी विभागातील जिल्हानिहाय सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतिपादन केले.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *