“भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल” असे म्हणत रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्याची निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. गाबा कसोटीत पावसामुळे सामना थांबला तेव्हा विराट कोहलीबरोबर (ViratKohli) बोलताना अश्विन खूप भावुक झालेला दिसला. विराट त्याला मिठी मारत त्याचं सांत्वन करताना देखील दिसला. ज्याचा व्हीडिओ ही व्हायरल होताच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली दरम्यान सामना संपताच शेवटी त्याने पत्रकार परिषदेत निवृत्ती जाहीर केली.
न
रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला असून या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. गाबा कसोटी दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा (RohitSharma)आणि विराट कोहलीला देखील मिठी मारली. अश्विनने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (GauthamGambhir) यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली.
अश्विन निवृत्ती जाहीर करताना म्हणाला की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी क्लब-क्रिकेट खेळत राहिन. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल, मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी निर्माण केल्या आहेत, असे अश्विनने पत्रकार परिषदेत सांगितले. बीसीसीआय (BCCI) आणि बाकीच्या सहकाऱ्यांना तसेच रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा यांना आभार व्यक्त करतांना रविचंद्रन अश्विन भावुक झाले.
रविचंद्रन अश्विनची Test match मधील कारकीर्द नक्कीच वाखाडन्या जोगी आहे.
आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ३७ वेळेस ५ विकेट घेतले आहेत आणि ८ वेळा सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. अश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने टी-२० मध्ये ७२ विकेट घेतल्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ७६५ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली असून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३५०३ धावा आहेत आणि त्याने एकूण ६ कसोटी शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण ८ शतकं होती. रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

