छत्रपती संभाजीनगर: शहरातील शहागंज चेलीपुरा भागातील महावीर होल्सेलर किराणा दुकानाला तब्बल 5000 चौरस मीटरच्या मॉल मध्ये, मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आग लागली. तातडीने अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. मात्र आगीची भीषणता तीव्र असल्याने तब्बल ११ गाड्या पाण्याचे बम्ब आग विझविण्यासाठी हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत आग आटोक्यात आली असून. पूर्ण कूलिंगचे काम सर्व अकरा गाड्या यांच्या माध्यमातून पूर्ण झाले. कोणतीही जीवित हानी नाही. मात्र आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास येत आहे. या वेळी भाजपचे आमदार अतुल सावे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सह आजी माजी आमदारांनी घटनास्थळी भेट दिली. आगीच्या कारणाचे तपास पोलीस करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
A fire broke out at the Mahavir Wholesaler grocery store in Shahaganj Chelipura area of Chhatrapati Sambhajinagar city in a 5000 square meter mall at around 12:20 am. Two fire engines were immediately dispatched to the scene. However, as the fire was severe, 11 water tankers were deployed to extinguish the fire. The fire has been brought under control at present. The complete cooling work was completed by all the 11 tankers. There was no loss of life. However, it is being observed that the financial loss has been very large. At this time, BJP MLA Atul Save, Municipal Commissioner G. Srikanth, former MP Chandrakant Khaire and other former MLAs visited the scene. It was informed that the police are investigating the cause of the fire.