“STची भाडेवाढ परत घ्या” Chh. Sambhajinagar मध्ये ठाकरे गटाकडून चक्का जाम आंदोलन | Ambadas Danve

1 month ago 0 2

छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार चक्का जाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकातील गेटसमोर आज चक्काजमा आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने गोरगरीब जनतेवर लादलेल्या आर्थिक भुर्दंडा विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान ”एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे..परिवहन मंत्र्याचा धिक्कार असो..परिवहन मंत्री हाय.. हाय..” अशा जोरदार घोषणा देत सदरील निर्णय तातडीने रद्द करण्याची शासनाकडे मागणी व्यक्त करण्यात आली.

In Chhatrapati Sambhajinagar, Thackeray’s Shiv Sena drew the government’s attention by staging a massive Chakka Jam protest. Shiv Sena Thackeray’s party staged a Chakka Jam protest in front of the gate of Sambhajinagar Central Bus Station today against the ST fare hike, which is an integral part of the lives of the common man. Strong protests were expressed against the financial hardship imposed on the poor by the state government.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *