मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून मंत्रीपद न मिळालेले नेते संतप्त झाले आहेत. यावर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. ‘ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रीपद मिळते. मला मंत्रीपद मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन देऊनही ते मिळाले नाही. पण मी नाराज नाही, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
After the cabinet expansion, discontent has flared up in all the three parties in the grand alliance and the leaders who did not get ministerial posts are angry. On this, Chhagan Bhujbal and Sudhir Mungantiwar gave vent to their displeasure. ‘Those whose son contested from another party get ministerial posts. Even though Chief Minister Devendra Fadnavis and state president Chandrashekhar Bawankule assured me that I will get ministerial posts, I did not get them. But I am not angry,’ expressed Sudhir Mungantiwar.