गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी दुपारी जोरदार धडक दिली. या बोटीमध्ये जवळपास ११४ प्रवासी होते. या दुर्घटनेत प्रवासी, बोट समुद्रात बुडून १३ जणांचा मृत्यू, तर त्यांपैकी ९९ प्रवाशांना वाचविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिलीये. तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असंही म्हटलं जातंय. या बोटीमध्ये लहान मुलं, तसेच अनेक कुटुंबांचा सामावेश होता.
A Navy speedboat hit a passenger ferry, Nilkamal, which was heading to Elephanta from Gateway of India on Wednesday afternoon. There were about 114 passengers on board. In this accident, 13 people died when the boat sank in the sea, while 99 of them were rescued, Chief Minister Devendra Fadnavis told the media. It is also said that the speedboat that hit the passenger boat belonged to the Navy. There were many families and small children on board.