मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा.

2 months ago 0 2

मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर दाखल करण्याचे निर्देश साकीनाका पोलीस स्टेशनला द्यावेत, अशी लेखी तक्रार मविआचे उमेदवार नसीम खान यांचे मुख्य पोलींग एजंट गणेश चव्हाण यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदार संघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी मतदान सुरु असताना म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो काढून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आदर्श आचार संहितेचा उघड भंग असून ही अनधिकृत उपस्थिती गंभीर चिंता निर्माण करणारी तसेच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीला बाधा पोहचवणारी आहे.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *