मुंबईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह येथून केले मतदान
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मातोश्री महाउपासिका मिराताई आंबेडकर यांनी आज विधानसभा निवडणुक २०२४ मधील मतदानाचा अधिकार राजगृह, मुंबई येथून बजावला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरीच मतदान (गृहमतदान) करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
गृहमतदान प्रक्रियेचा म्हणजे एकप्रकारचे मतदान केंद्रच होय. या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी, एक शिपाई आणि बंदोबस्ताला पोलिस असे हे पथक असते. हे पथक मतदाराच्या घरी पोहोच- ल्यानंतर त्यांना आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो आहोत, याची माहिती देतात. मतदान केंद्रावर होणाऱ्या प्रक्रियेप्रमाणेच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते.
मतदान केंद्राप्रमाणेच येथेही मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पाडली जाते. त्यामुळे मतदानाची गुप्तता कायम राहते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका दोन पाकिटांत बंदिस्त करून मतपेटीत टाकली जाते.