आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, आपल्या देशात 1950 पूर्वी, वर्ण व्यवस्था अस्तीत्वात होती. वर्ण व्यवस्थेने ज्या ज्या मानवांना हीन समजले, अशा लोकांना माणूस असूनही शिक्षणाची द्वारे बंद होती. त्यांना पिण्याला पाणीही मिळत नसे, समाजात राहण्यासाठीही, हक्काचे घर नव्हते. जुनाट रूढीप्रिय समाजात बदल करण्यासाठी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रबोधन केले. समाज सुधारणा केली. यामध्ये बरोबरीचा वाटा उचलला त्या सावित्रीबाई फुले यांनी. अशा महान समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात सर्व प्रथम महिलांची शाळा स्थापन केली. समाजाला मानवतेची दिशा दिली. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात तसेच राज्यात विविध मान्यवरांनी अभिवादन करून, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर काही ठिकाणी वही पुस्तकांचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
Today is the birth anniversary of Kranti Jyoti Savitribai Phule. Before 1950, the caste system existed in our country. The caste system considered such people inferior, but despite being human, the door to education was closed to them. They did not even get water to drink, they did not have a proper house to live in the society. To change the old stereotyped society. Mahatma Jyotiba Phule enlightened. He reformed the society. Savitribai Phule played an equal role in this. Such great social reformers Mahatma Phule and Savitribai Phule established the first women’s school in India. They gave the society a direction of humanity. Today, on the birth anniversary of Savitribai Phule, various dignitaries in the city and the state greeted her and shed light on her work. At some places, the birth anniversary was celebrated by distributing notebooks and books.