विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या भरघोस यशानंतर तब्बल एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची कसरत संपली आहे. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झालीय. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती महायुतीतील सूत्रांनी दिली असून काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने या पदांचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर १२ दिवसांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यानंतर १० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि अजित पवार यांना अर्थ, राज्य उत्पादन असे खाते देण्यात आले आहे.
The latest news on Maharashtra’s political landscape highlights the complete list of cabinet ministers, their posts, and the distribution of portfolios among the BJP, Shiv Sena, and NCP in the state government. A tug-of-war has begun between ministers from all three parties BJP, Shiv Sena, and NCP over who would be appointed as the guardian minister for their respective districts in Maharashtra.