प्रतिनिधी: तिरूपती देवस्थानाच्या लाडू प्रसादात गायीची व इतर जनावरांची चरबी मिळवल्याने देशभर नवा वादंग निर्माण झाला होता. तसेच हिंदू समाजाच्या आस्थाही दुखावल्या होत्या. चंद्राबाबू नायडू यांनी याविषयी भाष्य करत विरोधी पक्ष वाय एस आर.काँग्रेसचे नेते वाय एस जगमोहन रेड्डी यांच्यावर ‘अक्षम्य चूक’ केल्याचा ठपका ठेवल्याने या घटनेच्या राजकारणाने वेग पकडला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना वाय एस आर रेड्डी यांनी ‘ चंद्राबाबू नायडू यांच्याकडे आपल्या कारभारावर बोलण्यासारखे नसल्याने व पहिल्या १०० दिवसांच्या कारकीर्दीवर लोकांचा राग असल्याने विषय बदलण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी हा विषय पुढे केल्याचे म्हटले आहे. लोकांचे लक्ष वळवण्यासाठी केलेली खेळी असल्याचेही त्यांनी म्हणत चंद्राबाबू यांना लक्ष केले आहे.तसेच चंद्राबाबू राजकारणासाठी देवाचा वापर करत असल्याचा दाखलाही रेड्डी यांनी दिला आहे.
आम्ही तूप पुरवठा करणारा ठेकेदारही बदलला असल्याची माहिती चंद्राबाबू नायडू यांनी याप्रसंगी दिली आहे. तसेच लोकांच्या आस्थेला दुखापत झाल्याचे लोक म्हणत असताना दोषींना मी कसे माफ करू असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते.याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही नाराजी व्यक्त करत संबंधित माहिती आपण वर्तमानपत्रात वाचल्याचे नमूद केले होते.’संबंधित गोष्टींची चौकशी व्हावी ‘असेही जे पी नड्डा म्हणाले होते. दरम्यान तिरुमाला तिरूपती देवस्थान मंदिर प्रशासनाचे विश्वस्तांनी आपण तूपाचा पुरवठा किफायतशीर दरात करतो. यासंबंधीची माहिती देवस्थानचे जे शामला राव यांनी माहिती देताना एनडीडीबी कालएएफ (NDDN CALF) यांना संबंधित चार तुपाचे नमुने ६ जुलै व १२ जुलैला लॅब चाचणीसाठी पाठवले असल्याचे म्हटले होते. राव यांच्या म्हणण्यानुसार हे नमुने ए आर डेअरी फुड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुरवठा केल्याचा गौप्यस्फोट राव यांना केला होता.
राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच्या रेड्डी सरकारने संबंधित तुपाचे कंत्राट १२ मार्चला या कंपनीला देण्यात आले होते.टीडीपीचे सरकार आल्यानंतर कंत्राट नंदिनी तूप कंपनीला मिळाले होते. देवस्थानाकडे प्रयोगशाळा नसल्याने ते नमुने एनडीडीबीला देण्यात आले होते ज्यामध्ये प्राण्यांची चरबी सापडल्याचे निष्पन्न झाले होते असे राव म्हणाले आहेत. मात्र हे आरोप ए आर डेअरीने फेटाळले असून यात तथ्य नसल्याचे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
तसेच आगामी काळात तुपाच्या दर्जात कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयीची माहिती एक्सवर देत हे लड्डू दर्जेदार असतील हे आश्वासन श्रीवरी लड्डू प्रसादाबाबत मंदीर प्रशासनाने दिले आहेत.याबद्दल पोस्ट लिहिताना, ‘श्रीवरी लाडू प्रसादाचे पावित्र्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे’ असे म्हटले आहे. याप्रकरणी देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत असताना भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी या प्रकरणात आंध्र प्रदेश सरकाला निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच मागील ४ वर्षांची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
