वर्धापन दिनानिमित्त ३ दिवस कार्यक्रमांची रेलचेल
छत्रपती संभाजीनगर:
महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज, औरंगपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रशासक व कर्मचाऱ्यांनी विविध स्थळी महापुरुषांना अभिवादन करून ४२ व्या मनपा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांची सुरवात केली.
मनपा मुख्यालयातील महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर संत जगनाडे महाराज यांची जयंती देखील साजरी करण्यात आली, ४२ व्या मनपा वर्धापन दिनानिमित्त सर्व ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त ३ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
४२ व्या मनपा वर्धापन दिनानिमित्त ०९, १० व ११ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ०९ डिसेंबर रोजी मनपा मुख्यालय येथे रक्तदान शिबिर, आयुक्त संघ व पत्रकार संघ यांच्यात क्रिकेट मॅच, आनंद नगरी, महिलांसाठी रांगोळी, नेल आर्ट, आदी स्पर्धा, तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी अंताक्षरी स्पर्धा आयोजित केली आहे.
दि.१० डिसेंबर मनपा मुख्यालय येथे विविध फन गेम यात संगीत खुर्ची, रस्सी खेच, वेशभूषा, केशभूषा, रॅम्प वॉक, बुद्धिबळ स्पर्धा, मनपा अधिकारी कर्मचारीयांच्या करिता स्नेह भोजन ,संत एकनाथ रंग मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ११ डिसेंबर रोजी मनपा मुख्यालय येथे डॉ.आदित्य कुमार जोशी यांचे योग, आयुर्वेद व निसर्गोपचार या विषयांवर व्याख्यान, महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या वतीने नवीन जेसीबी, कोंडवाडा , डिझेल ब्राऊझर वाहनांचे लोकार्पण. संत एकनाथ रंग मंदिर येथे उत्कृष्ठ अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान सोहळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण आवश्यक- श्रीमंत अमरजीत राजे बारगळ 
रेल्वेस्टेशन, विमानतळावर छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा अशी अंबादास दानवेंची मागणी
नव्या वर्षापासून प्रत्येक महिन्यातील ‘एक दिवस सैनिकांसाठी’ छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय