विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष; मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष: नाना पटोले

1 year ago 0 6

बिटकॅाईन प्रकरणातील व्हायरल क्लिपमधील आवाज माझा नाही; खोटे आरोप करून बदनाम करण्याचे भाजपचे कट कारस्थान जनता उधळून लावेल

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते? कार्यकर्त्यांना भेटायला गेलो हा तावडेंचा बचाव चुकीचा आहे. प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरच्या नेत्यांना थांबता येत नाही असा नियम आहे, त्यामुळे विनोद तावडे जे सांगत आहेत ते खोटे आहे. आर्वी विधानसभेचे भाजपा उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक आहेत, या वानखेडेंच्या गोदामात दारुच्या बाटल्यांचा साठा सापडल्या. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही हा दारु साठा कसा आला? मतदारांना पैसे व दारु वाटून भाजपाचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे.
लोकसभेत व्होट जिहाद झाल्याचा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. एखाद्या जात समुहाने एका पक्षाला मतदान करा असे आवाहन केले तर त्याला भाजपा व्होट जिहाद म्हणतो. मतदान कोणाला करायचे हा मतदाराचा हक्क आहे. आता एका समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, त्यालाही ‘जिहाद’ म्हणायचे का? असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा…
बिटकॉईन प्रकरणात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या खोट्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॅाईन प्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची व माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाने केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशा-यावर खोडसाळपणे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरु आहे तो माध्यमांनी तात्काळ थांबवावा अन्यथा खोट्या बातम्या देणा-या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही असे पटोले म्हणाले.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *