परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटल्या नंतर, कस्टडी मध्ये युवक मृत झाल्याने पुन्हा वातावरण चिघळले आहे. या प्रकरणी आंदोलकांनी राज्यभर आंदोलन करत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. छ. संभाजीनगर जिल्हा आणि ग्रामीण भागातील सर्व ठिकाणी बंद ठेवण्यात आला असून जिल्हातील सर्व तहसिलवर निवेदन देण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक महत्वाच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शहरातील प्रसिद्ध क्रांतीचौक येथे जमून कस्टडीतील मयत कार्यकर्त्याला न्याय मिळावा तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी हजारोच्या संख्येने आंबेडकरी जनता आणि समविचारी पक्ष तसेच संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे.
After the repercussions of the contempt of the constitution case in Parbhani spread across the state, the atmosphere has become tense again due to the death of a youth in custody. In this case, the protesters had been protesting across the state and called for a Maharashtra bandh. Ch. Sambhajinagar district and all places in rural areas have been closed and a statement has been given to all the tehsils in the district. On this occasion, many important leaders and activists of the Ambedkar movement gathered at the famous Kranti Chowk in the city and demanded justice for the deceased activist in custody and action against the culprits. On this occasion, thousands of Ambedkarites and like-minded parties and organizations have participated in the bandh.


