ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ आज सोलापुरात धडाडणार

1 year ago 0 3

अँजीओप्लास्टीनंतरची पहिलीच सभा

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा होणार आहे. मध्यंतरी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांनतर ही त्यांची पहिलीच सभा आहे.

रुग्णालयात असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काळजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असे त्यांनी म्हटले होते.

ओबीसी आरक्षण, आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमीलेयर, आदिवासींचे प्रश्न, मुस्लीम, भटके विमुक्त यांचे प्रश्न या संदर्भात वंचित बहुजन आघाडी वारंवार स्पष्ट भूमिका घेत आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एससी, एसटी, ओबीसी, मुस्लीम हे मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळत असल्याचे चित्र आहे. आता प्रकाश आंबेडकर सोलापुरात काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *