आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जारी केला. वचननामा मातोश्री वरून प्रकाशित केल्यानंतर भाजपा नेते व प्रवक्ता चंद्रशेखर बावनकुळेंनी खोचक टीका केली आहे.
“अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो.”
निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरु असणारे टिकांचे सत्रांमध्ये मतदार राजा कुणाचे सरकार निवडून आणतोय हे बघण्यासारखं असणार आहे.

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 


