सीएनजी च्या दरवाढीने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागलीये. राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर, तसेच नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आणि पेट्रोल डिझेलच्या वाढीनंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सीएनजीच्या दरात नुकतीच वाढ झाली असल्याने रिक्षा चालक, वाहन चालकांना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे आणि या संदर्भातच रिक्षाचालकांनी आपली प्रतिक्रिया आपल्या प्राईम टाईम महाराष्ट्राच्या माध्यमातून मांडली आहे. यावेळी रिक्षाचालक संतप्त होऊन म्हणाले की एकवेळ योजना कोणत्याही नाही दिल्या तरी चालेल, मात्र महागाई वाढवू नका. एकीकडे लाडक्या बहिणीने पैसे द्यायचे आणि तिकडे दाजीच्या खिशातून पैसे काढायचे अशा संतप्त प्रतिक्रिया या रिक्षाचालकांकडून देण्यात आल्या त्याचबरोबर या सीएनजीचा दरवाढी संदर्भात हे वाहन चालक/ रिक्षाचालक मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यातून जर यावर तोडगा निघाला नाही तर सर्वजण एकत्र येऊन आंदोलन सुद्धा करणार असल्याचा इशारा या रिक्षा चालकांनी दिलाय.
The recent hike in CNG prices has put a strain on drivers’ finances. After the assembly elections in the state, the formation of a new government, and the increase in petrol and diesel prices, CNG prices have risen for the second time. This has severely impacted rickshaw and vehicle drivers, who have expressed their frustration through the Prime Time Maharashtra channel. The rickshaw drivers voiced their anger, stating that they can manage without any one-time relief schemes, but cannot bear the increase in inflation. They argued that while the government is offering financial aid to one group, it is simultaneously taking money from their pockets. In response, the vehicle and rickshaw drivers plan to submit a statement to the Chief Minister regarding the CNG price hike and will seek a meeting with him. If no solution is reached, they will unite and protest.