वडगाव शेरी हा पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. वर्ष २०१९चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल विजय टिंगरे असून २०१४ मध्ये जगदीश तुकाराम मुळीक यांनी भारतीय जनता पक्ष मधून निवडणूक जिंकली होती या अगोदर हा मतदार संघ २००९ मध्ये बापूसाहेब तुकाराम पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिंकला होता. वडगाव शेरी मतदार संघातून यंदा बापूसाहेब तुकाराम पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून लढणार असून ते याच विधानसभेचे माजी आमदार असल्याने ही लढत त्यांच्यासाठी जुनीच मानली जात आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून २४ उमेदवारांपैकी आठ जणांनी माघार घेतली असून आता एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत.
माघार घेतलेले उमेदवार खालीलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील.
१) सुरेंद्र बापूसाहेब पठारे
२) सुनील बबन खांदवे
३) विनोद भगवान वैरागर
४) आशा उदय चौधरी
५) सुनील नारायण अंधारे
६) अशोक वामन जगताप
७) हरून करी मुलांनी
८) शईबाज हुसेन अब्दुल कयूम चौधरी
निवडणूक रिंगणातील उमेदवार खालील प्रमाणे
१) हुलगेश मर्याप्पा चलवादी (बसपा)
२) बापूसाहेब तुकाराम पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
३) सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी काँगेस अजित पवार)
४) चंद्रकांत परमेश्वर सावंत
५) विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पार्टी)
६) विवेक कृष्णा लोंढे (वंचित)
७) शेषनारायण भानुदास खेडकर
८) सचिन दुर्वा कदम
९) सतीश इंद्रजीत पांडे
१०) संजय लक्ष्मण पडवळ
११) अनिल विठ्ठल धुमाळ
१२) अभिमन्यू शिवाजी गवळी
१३) बापू बबन पठारे
१४) मधुकर मारुती गायकवाड
१५) राजेश मुकेश इंद्रेकर
१६) शशिकांत धोंडीबा राऊत

