१. सध्याची मोठी बातमी, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजीचा भडका उडाला आहे. चार बडे नेते नाराज असून एकाने थेट राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार(#abdulsattar), तानाजी सावंत(#TanhajiSawant), दीपक केसरकर(#DeepakKesarkar), विजय शिवतारे(#VijayShivtare), प्रकाश सुर्वे(#PrakashSurve)
यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला.
२. अखेर मनोज जरांगेंचा(#ManojJarange) पत्ता ओपन, अंतरवालीमधून केली मोठी घोषणा. रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. यावेळी आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं जरंगे पाटील म्हटलं आहे. सोबतच मी जर उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरांमधून मराठे उपोषणाला बसतील, अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
३. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला बस अपघाताचा विषय विधान परिषदेत सुनील शिंदे(#SunilShinde) यांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1300 बसेस घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्या १३०० बसेस लवकरच ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत असेही ते म्हणालेत. यावर सुहास सामंत यांनी प्रत्युत्तर दिलाय. नको त्या कंपन्यांच्या गाड्या आणल्या गेल्या असून त्याच्यावर बेस्टच्या लोगो असल्याने बेस्टची नाचक्की होत आहे, असे बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे.
४. लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी – 514 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणीसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातं आहे.
५. परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी आज आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळं महाराष्ट्र बंदचे पडसाद आज मुंबईच्या चेंबूर(#chembur) भागात पाहायला मिळाले. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानतंर चेंबूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन सुरु होते. यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. परिणामी दहिसरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 


