पुणे शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामध्ये एका दहा वर्षाच्या मुलावर येथील भटक्या कुत्र्यांनी भयंकर हल्ला केलाय. आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी पुणे महानगरपालिकेला चांगलं सुनवलंय. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर केला नाही तर आम्ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तसेच श्वानप्रेमींच्या घरात ही कुत्री आणून सोडू असा इशारा देखील रूपाली पाटील यांनी दिलाय.
The city of Pune is currently facing the problem of stray dogs. A ten-year-old boy has been viciously attacked by stray dogs in the Bharati Vidyapeeth area of Pune. And that is why Nationalist Congress Party spokesperson Rupali Thombare Patil has given a good hearing to the Pune Municipal Corporation. Rupali Patil has also warned that if the stray dogs are not controlled as soon as possible, we will bring these dogs to the houses of Pune Municipal Corporation officials and dog lovers.