आजही देशातील काही भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. जेणेकरून प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल. केंद्र सरकारने हर घर नल योजना सुरू केली आहे. ‘हर घर नल से जल’ उपलब्ध करुन देण्यासाठी जल जीवन मिशन या योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११६४ कामे सुरु करण्यात आली असून ६३५ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज यंत्रणांना दिले.
जलजीवन मिशन संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, कार्यकारी अभियंता वाघमारे, तसेच सर्व यंत्रणा प्रमुखआदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जलजीवन मिशन संदर्भातील कामांचा आज आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलजीवन मिशनची ११६४ कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ६३५ कामांची भौतिक प्रगती झाली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली आहे. तथापि, उर्वरित कामे मात्र किरकोळ तांत्रिक सोपस्कारांअभावी प्रलंबित दिसत आहेत. त्यासाठी आवश्यक ना- हरकत पत्रे, दाखले इ. ची पूर्तता करुन कामांची पूर्तता करुन घ्यावी. त्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामविकास विभाग इ. विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण आवश्यक- श्रीमंत अमरजीत राजे बारगळ
रेल्वेस्टेशन, विमानतळावर छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा अशी अंबादास दानवेंची मागणी
नव्या वर्षापासून प्रत्येक महिन्यातील ‘एक दिवस सैनिकांसाठी’ छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगरातील जि.प. शाळांचे ‘मनरेगातून’ होणार सौंदर्यीकरण आणि सुविधाविकास