ॲड. प्रकाश आंबेडकराच्या सभेसाठी समता मैदान ओव्हरफ्लो !

1 year ago 0 5

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची समता मैदान यवतमाळ येथे जंगी जाहीर सभा पार पडली.
यवतमाळ मतदारसंघातील डॉ. नीरज वाघमारे यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती/जमातीचे आणि ओबीसीचे आरक्षण धोक्यात असल्याचे यावेळी नमूद केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषदांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होणार असा निर्णय न्यायालयाने दिला असल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

ओबीसींची टक्केवारी किती ? हे माहीत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण थांबवण्यात आले आहे. ओबीसींना खुल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल आणि अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणाबरोबर क्रीमिलेयरची व्याख्या सुद्धा करण्यात आलेली आहे. ज्यांनी आरक्षणाचा एकदा लाभ घेतला असेल त्यांच्या वारसांना पुन्हा आरक्षण मिळणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यातील मुस्लिम समाज प्रचंड दहशतीमध्ये आहे औरंगाबाद मध्ये मुस्लिमांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदू मुस्लिम दंगली घडल्या होत्या. त्यामुळे मुस्लिम शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः औरंगजेबाच्या समाधीवर चादर चढवून औरंगजेबाच्या मजारीवर चादर चढवणे हा गुन्हा असेल तर आमच्यावर केसेस कराव्या असे विधान करून वंचित बहुजन आघाडीने मुस्लिमांच्या बाजूने संदेश दिला आणि महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम दंगली रोखण्यात ॲड. आंबेडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याची आठवणही यावेळी आंबेडकरानी करून दिली.

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे यावर भाष्य करताना आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा.

शहरात महिलांच्या सार्वजनिक प्रसाधन गृहांची व्यवस्था नाही – डॉ. नीरज वाघमारे

एक गब्बर तुम्हाला माहीत आहे. दुसरा गब्बर शहरातील गुंडागर्दीला प्रोत्साहन देतोआहे, तर तिसरा गब्बर तरुणांना व्यसनाधीन बनवत आहे. ही यवतमाळची गंभीर वस्तुस्थिती यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. नीरज वाघमारे यांनी मांडली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शहरांमध्ये महिलांच्या सार्वजनिक प्रसाधनगृहाची साधी व्यवस्था नाही, याबद्दल खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी यवतमाळ जिल्हा निरीक्षक ॲड. प्रियदर्शी तेलंग, पुसद मतदार संघाचे माधवराव वैद्य, दारव्हा/दिग्रस मतदार संघाचे नाजुकराव धांदे, राळेगाव मतदार संघाचे किरण कुमरे, वणी मतदार संघाचे राजू निमसटकर आणि उमरखेड मतदार संघाचे उमेदवार तातेराव हनवते उपस्थित होते.

बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेपूर्वी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचे गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला हजारो शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी प्रचंड गर्दी करुन भरभरून दाद दिली.

सभेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले, महिला आघाडी अध्यक्षा-धम्मवती वासनिक,महासचिव पुष्पाताई शिरसाट, युवा आघाडी अध्यक्ष-आकाश वाणी, मंगेश दहिकर, शहराध्यक्ष-गजानन सावळे, शहर महासचिव रत्नमाला कांबळे, यवतमाळ तालुका अध्यक्ष-प्रफुल शंभरकर, महिला शहराध्यक्ष-शोभना कोटंबे, शहर महासचिव- प्रमोद पाटील, शहर उपाध्यक्ष-विलास वाघमारे, महिला उपाध्यक्ष मीनाताई रणित,वंदना उरकुडे, संध्या काळे,सचिव- भारती सावते, करुणा मून, करुणा चौधरी, सुकेशनी खोब्रागडे, सविता तिडके, शीलाताई वैद्य संगीता भवरे, प्रफुल पाटील आदेश मेश्राम सतीश कांबळे किरण तिरपुडे,शैलेश भानवे, अशोक मनवर,दिपक नगराळे, केशव भागवत, राजेंद्र तलवारे, खंडेश्वर कांबळे,संघपाल कांबळे घाटंजी तालुका, अध्यक्ष विविध नगरातील शाखा अध्यक्ष, आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांनी सभेचे यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले. सभेचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव शिवदास कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हा निरीक्षक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी केले.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *