काँग्रेस पक्ष एवढा आंबेडकर विरोधी का? आंबेडकरांना अपशब्द बोलणाऱ्याचा प्रचार राहुल गांधी करणार !

1 year ago 0 5

मुंबई : अकोला लोकसभेचे उमेदवार अभय पाटील यांचा सत्कार हा प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केल्याने करण्यात आला आणि आता राहुल गांधी एका अशा व्यक्तीसाठी अकोल्यात प्रचाराला येत आहेत, ज्याने आंबेडकरांना शिवी दिली होती. काँग्रेस आंबेडकरांची एवढी विरोधक का आहे ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.

काँग्रेस पक्षाने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या अभय पाटीलला निवडणुकीत उतरवले. अभय पाटील ही निवडणूक हारले परंतु, तरीही काँग्रेस पक्षाने त्यांच्या विजयी उमेदवारांसोबत अभय पाटीलचा सत्कार केला असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, ही कुठलीही चूक नव्हती, तर “आंबेडकर” यांच्या पराभव केल्याने हा सत्कार केला होता आणि आता राहुल गांधी एका अशा व्यक्तीसाठी अकोल्यात प्रचाराला येत आहेत, ज्याने आंबेडकरांना शिवी दिली होती.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *